Saturday, July 21, 2012

तुला आता कदाचित काही आठवत नसेल...

तुला आता कदाचित काही आठवत नसेल
आठवले तरी काही फरक पडत नसेल...
बरीच दिवस झालेत आयुष्यातून गेलीस निघून ते
त्यामुळे तुला आता काही जाणवत ही नसेल...

ती बाग मात्र आजही तेवढीच हिरवी असेल
त्या बागेतला तो बाक ही तसाच तिथेच असेल
त्या बाकावर बसून तू कविता करायचीस माझ्या हातावर
पण तुला मात्र आता काही सुचतही नसेल..

ते झाड मात्र आजही आपली आठवण काढत असेल
ती कोकीळ आजही तेच गाणं गात असेल...
तिच्या गाण्याच्या तालात सूर मिळवायचीस तू
पण आता मात्र तुझा सूरही जुळत नसेल...

तो पहिला पाऊस आजही तसाच बरसत असेल
त्या पायवाटा आजही तश्याच भिजत असेल...
त्याच वाटांवरून माझा हात धरून चालायचीस तू
पण आज मात्र तुझा हात रिकामाच असेल..

बरीच दिवस झालेत आयुष्यातून गेलीस निघून ते
त्यामुळे तुला आता काही जाणवत ही नसेल...
बाहेरचा पाऊस अंगावर घेऊनही तू  कोरडीच राहत असेल
आत मात्र अश्रू बरसवून तुझ मन भिजून जात असेल...

                                                        -वैभव 

No comments:

Post a Comment