Tuesday, July 31, 2012

वेडी मने....

त्याचं वेडं मन...

खरं सांगायचं झालं तर
मी तुला आधीच बोलणार होतो.
गुपित या बालिश हृदयाचे
खूप आधीच खोलणार होतो.

खरं सांगायचं झालं तर
आवडली होतीस पहिल्यापासूनच
हृदयही शरण गेले तुला
पहिल्यांदा तुला पाहिल्यापासूनच.

खरं सांगायचं झालं तर
आता मनात ठेऊन राहवत नाही
तुला कुणा दुसऱ्याशी
नुसतं बोलतानाही पाहवत नाही

खरं सांगायचं झालं तर
तुझ्या प्रीती मुळे घडायला लागलोय,
कालच्याहून आज जास्त असा
रोज तुझ्या प्रेमात पडायला लागलोय.

खरं सांगायचं झालं तर
भीती वाटतेय थोडी, तू रागावशील..
पण राहवत नाही म्हणून विचारतोय,
पुढलं जीवन माझ्यासोबत घालवशील?

तीचं वेडं मन...

खरं सांगायचं झालं तर
मला नेहमीच असं वाटायचं.
जेव्हाही बघायचा तू मला
तुला काही तरी आहे बोलायचं.

खरं सांगायचं झालं तर
पहिल्यांदा तुझ्या डोळ्यात एक भाव दिसला.
बरेच जण होते कॉलेजमध्ये
मात्र तूच एक थेट हृदयात जाऊन बसलास.

खरं सांगायचं झालं तर
तू बोलावस म्हणून मी बोलते अनेकांशी
पण तुला मात्र कधी एक
शब्दही सुचत नाही बोलायला माझ्याशी.

खरं सांगायचं झालं तर
वाटत असं मला की कधी असं घडावं
न सांगता मला एकेदिवशी
तू माझ्या गुपचूप असं प्रेमात पडावं.

खरं सांगायचं झालं तर
धीर नाही मला पण मी कशी सांगणार?
मलाही तुझ्यावर प्रेम आहे.
तूच विचार ना कधी.. मी नाही नाही म्हणणार.

                                                -वैभव

Monday, July 30, 2012

फरक फक्त एवढाच आहे ...

फरक फक्त एवढाच आहे त्याच्यात आणि या जगात,
जग विरुद्ध असेल माझ्या तर तो उभा असतोच माझ्या पाठीशी ताठ.


फरक फक्त एवढाच आहे त्याच्यामध्ये आणि बाकी जणांमध्ये,
कुणीच समजलं नाही मला तरी त्याचे मन नक्की समजून घेईल एवढ्या मनांमध्ये.

फरक फक्त एवढाच आहे त्याच्यामध्ये आणि बाकी मध्ये
कितीही भांडलो आम्ही तरी अर्धा वाटा नक्कीच ठेवेल तो माझा maggi मध्ये.

फरक फक्त एवढाच आहे त्याच्या मध्ये आणि घरच्यांमध्ये
सारेच रागावले माझ्यावर तरी फक्त तोच येतो समजूत काढायला एकट्यामध्ये.

एकच इच्छा आहे की जीवन भर असाच राहावा साथ तुझा,
फरक एवढाच आहे की जगासारखा असूनही जगाहून वेगळा आहे दादा माझा.


                                                                              -- वैभव 

Saturday, July 21, 2012

तुला आता कदाचित काही आठवत नसेल...

तुला आता कदाचित काही आठवत नसेल
आठवले तरी काही फरक पडत नसेल...
बरीच दिवस झालेत आयुष्यातून गेलीस निघून ते
त्यामुळे तुला आता काही जाणवत ही नसेल...

ती बाग मात्र आजही तेवढीच हिरवी असेल
त्या बागेतला तो बाक ही तसाच तिथेच असेल
त्या बाकावर बसून तू कविता करायचीस माझ्या हातावर
पण तुला मात्र आता काही सुचतही नसेल..

ते झाड मात्र आजही आपली आठवण काढत असेल
ती कोकीळ आजही तेच गाणं गात असेल...
तिच्या गाण्याच्या तालात सूर मिळवायचीस तू
पण आता मात्र तुझा सूरही जुळत नसेल...

तो पहिला पाऊस आजही तसाच बरसत असेल
त्या पायवाटा आजही तश्याच भिजत असेल...
त्याच वाटांवरून माझा हात धरून चालायचीस तू
पण आज मात्र तुझा हात रिकामाच असेल..

बरीच दिवस झालेत आयुष्यातून गेलीस निघून ते
त्यामुळे तुला आता काही जाणवत ही नसेल...
बाहेरचा पाऊस अंगावर घेऊनही तू  कोरडीच राहत असेल
आत मात्र अश्रू बरसवून तुझ मन भिजून जात असेल...

                                                        -वैभव 

Friday, July 20, 2012

सच है कहते लोग शायद देर अंधेर के बारे मे..

सच है कहते लोग शायद देर अंधेर के बारे मे..
भगवान किसीको नही रखता गम के दायरे मे...

मैने तो मांगा था एक सच्चा प्यार नसीब मे...
कहा पता था के कई जादा था मेरी लकीर मे...

अपने खजाने के चुनिंदा मोहरो मे से तुझे खोज लिया..
और मेरी मुराद पुरी करने के लिये तेरे जैसा दोस्त दिया..

तेरी दोस्ती ने न की सिर्फ प्यार करना दिखा दिया...
बल्की प्यार से भी बढकर जिंदगी जीना सिखा दिया...

अच्छा है के इन्सान किमत के साथ नही आता...
वरना तेरे जैसा दोस्त मै कभी खरीद ही न पाता...

तेरे आने से पहले मेरी ये जिंदगी बडी थी बेरंग...
अब रात के अंधेरे मे भी दिखे सुरज की किरण...

सच ही कहते लोग शायद देर अंधेर के बारे मे..
जिंदगी बदल जाती है ऐसे दोस्तो के सहारे मे...

-वैभव 

Sunday, July 8, 2012

"प्रेमात पडलोय मी तुझ्या.. म्हणूनच कदाचित."


काही दिवसांपासून ना फार वेगळ घडतंय,
जणू काही सगळच काल्पनिक एकत्रित..
तुला बघतो ना रोज.. म्हणूनच कदाचित.

आजकाल कुणाचा रागही नाही येत मला,
सहसा ओठांवर असतं एक गोड असं स्मित..
तुझा विचार करतो ना.. म्हणूनच कदाचित.

अवतीभवतीच हे सारं जगच बदललंय जणू,
जसा स्वप्नांच्या जगात शिरलोय आकस्मित..
हसून तू पाहिलेस काल.. म्हणूनच कदाचित.

जगण्यात आता वेगळीच मजा येतेय मला,
वाटतंय की सारी परिघं वाढलीये एक एक वीत..
तुझा सहवास मिळाला ना.. म्हणूनच कदाचित.

आपले मैत्रीचे नाते आता इथेच संपवूया आपण,
असं वाटतंय की काही नाही ठेवलाय या मैत्रीत..
कारण...
"प्रेमात पडलोय मी तुझ्या.. म्हणूनच कदाचित."

                                                --वैभव 

Saturday, July 7, 2012

हे आयुष्याचं गणित...

आयुष्याच हे गणित फारच विचित्र आहे
अजून पर्यंत कुणाला उलगड्लेलच नाही,
सुटता सुटेना कुणास काही केल्या जमेना
पण वाटतंय की अजून काही बिघडलेलच नाही.

बघता बघता अख्खं आयुष्य निघून जातं
रुपये पैश्याच्या या बेरीज अन वजाबाकीत,
कमवता कमवता पूर्ण आयुष्य शेवटला येतं
अन मोलाचे क्षण मात्र राहून जातात थकीत.

सुखाचा गुणाकार अन दुःखाचा भागाकार
सतत चालू राहतात डोक्यात असले प्रश्न,
जे जवळ आहे त्यात कधी समाधान नाही
म्हणून लोन च्या नावावर घेतो सुखं उसण.

आधी नौकरी मग लग्न मग गाडी मग बंगला
असा मुलभूत गरजांचा करत असतो कंचेभागुबेव
एक एक करत मुलभूत गरजा भागल्या गेल्या
तरी तू मात्र या लोभापायी हा हव्यास चालू ठेव.

जीवनातलं ध्येय अगदी "एक्स" सारखं झालंय.
कितीही माळे बांधून बसलो टाकून खुर्ची टेबल
अन जरी कितीही पैसे, कितीही यश कमावले
तरीही मात्र "एक्स इज अन अननोन वेरीएबल".

खरंच फारच विचित्र आहे हे आयुष्याचं गणित.
कधीही कुणाला पूर्णपणे उलगडलेल नाही अजून.
जीवन संपूनही जाईल आणि जवळ येईल मरण
तरीही असच अर्धवट राहील हे मोठ्ठ समीकरण.

                                                 -- वैभव