Saturday, January 22, 2011

ये दिल

ये दिल, प्यार तो करता है
पर कहने से डरता है,
ये दिल जिसपे मरता है,
उसीको बताने से डरता है |

हर जगह उसीको ढून्ढता है,
हर गली उसीकी आवाज सुनता है
नाम तक उसका जानता नाही,
लेकीन दिल है की मानता नाही |

Tuesday, January 18, 2011

हा कसला जिव्हाळा, ही कसली त्यांची मैत्री म्हणायची - भाग २

हा कसला जिव्हाळा, ही कसली त्यांची मैत्री म्हणायची,
दिवसातून २४ पैकी २५ तास ती त्याचाच विचार करायची.
त्याच्या सोबत असताना ती सारच काही विसरून जायची,
पण कुणी जर का 'प्रेमात असलेले कपल' असे म्हंटले की
तर थोडे लाजूनच, पण तो माझा मित्रच असा दावा करायची.

रोज सकाळी उठल्यापासून त्याच्या मेसेज ची वाट पहायची,
कधी का उशिरा उठली की घाईने आधी मोबाईल हाती घ्यायची.
एखादे वेळेस कधी मुद्दामच मेसेजचा reply नाही द्यायची,
आणि लगेच त्याचा 'उठली नाहीस का अजून?' चा मेसेज आला की
स्वतः हसून मग त्याला I am sorry चा reply द्यायची.

ही जशी काही त्यांची रोज सकाळची चर्याच बनली असायची,
चादरीच्या आत ती स्वतःला लपवून त्याचे मेसेज वाचायची.
कशीतरी बिछान्यातून बाहेर पडून मग दिवसाची सुरुवात व्हायची,
पण जरी घरचे काम सुरु असो, किंवा पुस्तक हाती असो
तिची नजर मात्र सतत मोबाईलच्या रिंग कडेच असायची.

मग तिने कधीतरी त्याच्याजवळ फिरायला जायची इच्छा दाखवायची,
आणि कसलीही भीती मनात न ठेवता चटकन त्याच्या बाईक वर बसायची.
बोलता बोलता मग त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून जायची,
किंवा जास्तच हिंडून का कंटाळा आला किंवा बोर झालेच की
गाडी एखाद्या कोपऱ्यावरच्या हॉटेलकडे वळवायला लावायची.

खायचा नसूनही त्याला पिझ्झा ची फ़रमाइश तिने करायची,
पण त्याला आवडतो म्हणून त्याने वडापाव ची प्लेट मागवायची.
उगाच मग लहान मुलासारखी तिने गाल फुगवून जिद्द करायची,
पण त्याने तिला चारायला हात समोर धरला की मग ती
गालावर सुंदरशी खळी पाडून गोडपणे हसायची.

पूर्ण दिवस बाहेर काढल्यावर मग त्याला ती घरी घेऊन जायची,
आणि दोघेही जाऊन मग धप्पकन सोफ्यावर पडून रहायची.
आठवडाभरा पूर्वीच पाहिलेल्या चित्रपटाची DVD परत लावायची,
आणि आवडीचा डायलॉग आणि आवडीचे गाणे लागले की
त्याला नाचता येत नसतानाही जबरदस्तीने सोबत घेऊन नाचायची.

अशीच मस्ती सुरु रहायची जोपर्यंत तिची आई तिला नाही ओरडायची,
मग तिच्या मनात इच्छा नसतानाही त्याला ती जायला सांगायची.
तरीही त्याने एकदातरी परतावे म्हणून तो जाईपर्यंत दारातच उभी रहायची,
आणि मग कसल्यातरी बहाण्याने तोही परत आलाच की
एखाद्या नवखी नवरी जशी लाजेल अगदी तशीच चक्क लाजून जायची.

त्यांची ही असली मैत्री मला नेहमीच विचारात पाडायची
की कसला हा जिव्हाळा, कसली ही त्यांची मैत्री म्हणायची,
दिवसातून २४ पैकी २५ तास ती त्याचाच विचार करायची.
त्याच्या सोबत असताना ती सारच काही विसरून जायची,
पण कुणी जर का 'प्रेमात असलेले कपल' असे म्हंटले की
तर थोडे लाजूनच, पण तो माझा मित्रच असा दावा करायची.

- वैभव

Friday, January 14, 2011

कसली ही मैत्री, हा कसला दोघांचा जिव्हाळा - भाग १



ही कसली मैत्री, हा कसला दोघांचा जिव्हाळा म्हणायचा,
एकमेकांशिवाय त्यांचा एकही क्षण रिकामा नाही जायचा.
कितीतरी गोष्टी, कितीतरी वेडेपणा अगदी कपल्स सारखा करायचा
पण कुणी का कधी 'प्रेमात असलेले कपल' म्हंटलेच की
'आमच्यात गाढ मैत्री शिवाय काहीच नाही' असा दावा करायचा.

रोज सकाळी त्याला डोळे उघडल्यावर एकच विचार असायचा,
मोबाईल हातात घेऊन आधी तिला त्याने मेसेज करायचा
मग तसंच बिछान्यात तिच्या reply साठी पडून राहायचा
पण कधी जर तिचा लगेच reply आला नाहीच की
मग अस्वस्थ होऊन "उठली नाहीस का अजून?" चा मेसेज पाठवायचा

रोजच सकाळचा अर्धा एक तास त्यांचा यातच जायचा,
याने तिला आणि तिने याला असाच सतत मेसेज करायचा.
कसाबसा मग त्यांचा दिवस मेसेज च्या पुढे जायचा
पण तरीही सायंकाळच्या आधी थोडाही वेळ मिळाला की
परत त्यांचा हा मेसेज चा खेळ सुरु लगेच व्हायचा.

मग तिला कधीतरी बाहेर फिरण्याचा मोह सुटायचा,
आणि पूर्ण दिवस बाईक वर हिंडून बाहेर काढायचा.
रस्ते संपले तरीही हिंडण्याचा मोहाला शेवट नसायचा
कधी जर का जास्तच हिंडून झाल्यावर थोडा दम लागला की
मग ताफा कोपऱ्यावरच्या एखाद्या हॉटेल कडे वळायचा.

तिला तसा नेहमीच डॉमिनोज चा पिझ्झा फारच आवडायचा,
तो मात्र खिशात पैसे नाहीत म्हणून मुद्दाम वडापावच चारायचा.
तिने मग उगाच राग धरून गुलाबी गालांचा फुग्गा करायचा
पण त्याने तिला वडापाव चरायला हात समोर धरला की
तो वडापाव ही तिला मग पिझ्झा चा विसर पाडायचा

दिवसभर बाहेर हिंडून झाल्यावर मग शेवटी घरचा रस्ता पकडायचा,
तिच्या घरी जाऊन मग LCD वर मुव्ही बघण्याचा प्लान बनवायचा.
सतराशे साठ वेळा पाहून झालेला एकच एक चित्रपट परत लावायचा
मग प्रत्येक आवडीचा डायलॉग आणि प्रत्येक आवडीचे गाणे लागले की
ओरडून ओरडून आणि नाचून नाचून साऱ्या घरभर धिंगाणा घालायचा

"पुरे झाली मस्ती आता सांजवाती कडे लक्ष द्या" मग तिला काकू म्हणायच्या,
आणि तिथून निघता न निघणारा त्याचा पाय त्याने जबरदस्तीने काढायचा.
तरीही फाटकापर्यंत जाईस्तोवर नकळत दहावेळा मागे वळून पहायचा
आणि निघतानाच सार समान नीट आठवणीने घेतलं असतानाही
काहीतरी आताच राहील म्हणून तिला शेवटच बाय म्हणायला परत यायचा.

असा हा कार्यक्रम त्यांचा महिन्यातून पाच सहा वेळा तरी चालायचंच.
आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी मला हाच विचार करायला लावायचा.
की खरंच कसली ही मैत्री, हा कसला दोघांचा जिव्हाळा म्हणायचा,
एकमेकांशिवाय त्यांचा कधी एकही क्षण रिकामा नाही जायचा.
पण तरीही कुणी का कधी 'प्रेमात असलेले कपल' असे म्हंटलेच की
'आमच्यात गाढ मैत्री शिवाय काहीच नाही' असा त्यांनी दावा करायचा.

- वैभव.

Thursday, January 13, 2011

कारण आज मला नितांत गरज भासतेय एका जणाची.


आज मला खऱ्या अर्थाने जाणीव होतेय त्या युगाची
कसलेही साधन, कसलाही संपर्क नसलेल्या जगाची
कारण आज मला नितांत गरज भासतेय एका जणाची.

जशी चातकाला गरज असते पाणी भरल्या गगनाची
आणि मोराला गरज असते आंब्याच्या वनाची
तशीच आज मलाही गरज भासतेय एका जणाची.

कशी तरी समजूत घालणार या व्याकूळ मनाची
ना काही संपर्क, ना काही बोलणे होतेय त्याच्याशी
आज मला नितांत गरज भासतेय एका जणाची.

रोज तर अंतर असते एक message किंवा एका फोनाची
आणि मग फोनही चिकटून बसतो एकमेकांच्या कानांशी
तेव्हा मात्र कधी जाणीवही झाली नाही असल्या क्षणाची.

पण आज खरीखुरी किंमत कळतेय त्याच क्षणाची
कारण बोलूनही झाले आज कित्येक जणांशी
तरीही आज मला गरज भासतेय एका जणाची.

आता मनातल्या गोष्टी कराव्यात तरी कुणाशी
किती काही बोलायचे आहे मला त्याच्याशी
आज खरच, खूप जास्त गरज भासतेय मला एका जणाची

- वैभव