Wednesday, April 20, 2011

तुला पाहिल्यापासूनच....

कविता वैगेरे तसा मी करायचो ते पहिल्यापासूनच,
पण त्यांचे यमक जुळायला लागले ते तुला पाहिल्यापासूनच
आणि त्यांना अर्थही मिळायला लागला तो तुला पाहिल्यापासूनच.

विचारही फार करायचो मी तसा... तेही पहिल्यापासूनच,
पण ते कागदावर उतरायला लागले ते तुला पाहिल्यापासूनच
अनो स्वतःची सीमा विसरायला लागले, तेही तुला पाहिल्यापासूनच.

प्रेम असतं यावर माझा विश्वासच नव्हता... पहिल्यापासूनच
पण प्रेमाचा खरा अनुभव यायला लागला तो तुला पाहिल्यापासूनच
आणि नसल्याक्षनीही तुझा भास व्हायला लागला, तो तुला पाहिल्यापासूनच.

प्रेम किती सुंदर कल्पना हे ठाऊकही नव्हते पहिल्यापासूनच,
पण त्या कल्पनेचा अंदाज यायला लागला तो तुला पाहिल्यापासूनच
आणि अंदाजाचा अनुभवही यायला लागला तोही तुला पाहिल्यापासूनच.

जगतही होतोच मी, सर्व जगतात तसा... पहिल्यापासूनच
पण त्या जगण्याला अर्थ मिळायला लागला, ते तुला पाहिल्यापासूनच
आणि हा प्रेमवेडा... पूर्णपणे तुझा व्हायला लागला, तेही तुला पाहिल्यापासूनच.

-वैभव

Saturday, April 16, 2011

एखादे दिवस आपण कधी असं करायचं, की...

एखादे दिवस आपण कधी असं करायचं,
बाहेर जाऊन येतो म्हणून घरी सांगायचं,
तू माझ्या, मी तुझ्या गाडीवर बसायचं
आणि अख्खं शहर पालथं घालून पडायचं.

पिझ्झा खाण्यापुरते पैसे नसले तरी चालेल,
पण डॉमिनो'झ मध्ये तरीही जाऊन बसायचं,
कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन गाव मांडायचं
आणि एक चोकोलावा केक अर्ध अर्ध खायचं.

एवढे दिवस जे नाही बोललो ते सर्व बोलायचं,
आधी कोण सांगणार यावर भांडण करायचं,
मग एकेकाने निवांतपणे मन मोकळ करायचं
अन जे काही मनात आहे ते सर्वच सांगायचं,

एखाद गोष्ट मला नसेल पटणार तरी चालेल,
पण तू मनात काहीच लपवून नाही ठेवायचं,
स्वतःच गुपितही तू स्वतःच उघडं करायचं
आणि हे लक्षात ठेऊन मी ही तसंच वागायचं.

अस केल तरच हे मैत्रीच नातं आणखी मजबूत व्हायचं,
५% किंवा २५% जीवालागापासून नसतं ग लपवायचं,
दोघांनी एकमेकांशी सर्वच काही शेअर असतं करायचं
माझ्या मते कदाचित यालाच मैत्रीच घट्ट नातं म्हणायचं.