Tuesday, January 18, 2011

हा कसला जिव्हाळा, ही कसली त्यांची मैत्री म्हणायची - भाग २

हा कसला जिव्हाळा, ही कसली त्यांची मैत्री म्हणायची,
दिवसातून २४ पैकी २५ तास ती त्याचाच विचार करायची.
त्याच्या सोबत असताना ती सारच काही विसरून जायची,
पण कुणी जर का 'प्रेमात असलेले कपल' असे म्हंटले की
तर थोडे लाजूनच, पण तो माझा मित्रच असा दावा करायची.

रोज सकाळी उठल्यापासून त्याच्या मेसेज ची वाट पहायची,
कधी का उशिरा उठली की घाईने आधी मोबाईल हाती घ्यायची.
एखादे वेळेस कधी मुद्दामच मेसेजचा reply नाही द्यायची,
आणि लगेच त्याचा 'उठली नाहीस का अजून?' चा मेसेज आला की
स्वतः हसून मग त्याला I am sorry चा reply द्यायची.

ही जशी काही त्यांची रोज सकाळची चर्याच बनली असायची,
चादरीच्या आत ती स्वतःला लपवून त्याचे मेसेज वाचायची.
कशीतरी बिछान्यातून बाहेर पडून मग दिवसाची सुरुवात व्हायची,
पण जरी घरचे काम सुरु असो, किंवा पुस्तक हाती असो
तिची नजर मात्र सतत मोबाईलच्या रिंग कडेच असायची.

मग तिने कधीतरी त्याच्याजवळ फिरायला जायची इच्छा दाखवायची,
आणि कसलीही भीती मनात न ठेवता चटकन त्याच्या बाईक वर बसायची.
बोलता बोलता मग त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून जायची,
किंवा जास्तच हिंडून का कंटाळा आला किंवा बोर झालेच की
गाडी एखाद्या कोपऱ्यावरच्या हॉटेलकडे वळवायला लावायची.

खायचा नसूनही त्याला पिझ्झा ची फ़रमाइश तिने करायची,
पण त्याला आवडतो म्हणून त्याने वडापाव ची प्लेट मागवायची.
उगाच मग लहान मुलासारखी तिने गाल फुगवून जिद्द करायची,
पण त्याने तिला चारायला हात समोर धरला की मग ती
गालावर सुंदरशी खळी पाडून गोडपणे हसायची.

पूर्ण दिवस बाहेर काढल्यावर मग त्याला ती घरी घेऊन जायची,
आणि दोघेही जाऊन मग धप्पकन सोफ्यावर पडून रहायची.
आठवडाभरा पूर्वीच पाहिलेल्या चित्रपटाची DVD परत लावायची,
आणि आवडीचा डायलॉग आणि आवडीचे गाणे लागले की
त्याला नाचता येत नसतानाही जबरदस्तीने सोबत घेऊन नाचायची.

अशीच मस्ती सुरु रहायची जोपर्यंत तिची आई तिला नाही ओरडायची,
मग तिच्या मनात इच्छा नसतानाही त्याला ती जायला सांगायची.
तरीही त्याने एकदातरी परतावे म्हणून तो जाईपर्यंत दारातच उभी रहायची,
आणि मग कसल्यातरी बहाण्याने तोही परत आलाच की
एखाद्या नवखी नवरी जशी लाजेल अगदी तशीच चक्क लाजून जायची.

त्यांची ही असली मैत्री मला नेहमीच विचारात पाडायची
की कसला हा जिव्हाळा, कसली ही त्यांची मैत्री म्हणायची,
दिवसातून २४ पैकी २५ तास ती त्याचाच विचार करायची.
त्याच्या सोबत असताना ती सारच काही विसरून जायची,
पण कुणी जर का 'प्रेमात असलेले कपल' असे म्हंटले की
तर थोडे लाजूनच, पण तो माझा मित्रच असा दावा करायची.

- वैभव

3 comments:

  1. Khup khup khup khup khup chan ahe kavita!
    Prachand avdali.

    ReplyDelete
  2. sundar kavita ahe...........apratim...

    ReplyDelete
  3. classsic owesum.... fantastic....gr888..... khup khup khup awadli....
    ek add kar na tyat Rag ala nastana sudha MANWA MANWI vaychi!!!

    ReplyDelete