Wednesday, November 17, 2010


रुक्ष उन्हाळ्यानंतर जशी पहिली सर पडत असते
कोरड पडलेल्या मातीची तहान भागवून जात असते
आसुसलेल्या चातकाची प्रतीक्षा संपवून जात असते
आणि माझ्या मनाला एक नवे तजेलेपण देऊन जात असते

पहिल्या सरी नंतरही दुसरी एखादी सर कोसळत असते
आधीच ओल्या मातीवर परत ठसा उमटविण्याचा प्रयत्न करत असते
पण कितीही तीव्र किंवा मुसळधार ही सर असते
पहिल्या सरीची आठवण जरा जास्तच स्मरणात असते

कोरडी माती आणि ओल्या पावसाचे नाते तसे जुनेच असते
तरीही प्रत्येक चार महिन्यांच्या भेटीत काहीतरी वेगळे असते
एकमेकांच्या साथीने नवे जीवन जगायचे असते
पूर्वी कधीही न घडले असे काहीतरी घडायचे असते

तुझ्या मैत्रीची सर जणू काही अशीच लाभलेली दिसते
प्रत्येक भेटीनंतर पुढल्या भेटीची ओढ लागलेली असते
या रुक्ष मनास जेव्हा तुझ्या मैत्रीची सर ओले करीत असते
मला एक नवे जीवन, एक नवे तजेलेपण देऊन जात असते.

--वैभव