Friday, June 25, 2010

माझी मैत्रीण...


माणसाने प्रेमात असावेच असे काही नाही,
पण प्रेमाहूनही जास्त, जणू "मैत्री"त असे काही.

प्रत्येकाला एक प्रेयसी असावीच असे काही नाही,
पण प्रेयसीहून समजूतदार, एक मैत्रीण अशी काही.

रस्त्यावरून चालताना जिने हात धरावाच असे काही नाही,
पण सोबत चालताना कधी साथ न सोडावी अशी काही.

जिने मनातले सर्व काही सांगावेच असे काही नाही,
पण माझ्या मनातले नकळत जाणून घ्यावे अशी काही.

खोडसाळपणा केल्यास हळूच हसावेच असे काही नाही,
पण कानाखाली वाजवायला लाजणार नाही अशी काही.

जिला कॉफी साठी विचारताच हो म्हणावीच असे काही नाही,
पण घरी नेऊन सर्वांसमोर कॉफी पाजावी अशी काही.

तिला गिफ्ट देता तिने स्वीकारावेच असे काही नाही,
पण वाढदिवशी न दिल्यास हक्काने मागणारी अशी काही.

मला भेटण्यासाठी घरी थाप द्यावीच असे काही नाही,
पण घरी उशीर झाल्यास माझ्यासोबतच होती सांगणारी अशी काही.

जगात प्रेमाचंच नाते सारे काही असते असे काही नाही,
तर प्रेमाहूनही अधिक जपता येणारे, जसे मैत्रीचे नाते असे काही.

--- वैभव.

चाललीच आहेस तर जाताना एवढे कर...

गैरसमजातून झालेल्या भांडणामुळे जेव्हा ती त्याला सोडून निघून गेली, तिच्या विरहाने तो वेडा पिसा झाला. त्याच्या वारंवार थांबव्ण्यानेही जेव्हा ती नाही थांबली, त्याने स्वतःचा देह त्यागून दिला. पण दुर्दैवाने त्याच्या आत्म्यालाही तिचा विसर नाही पडू दिला आणि तो तिच्या परत येण्याची वात बघू लागला.

मी कुठे म्हंटले कि मला सोडून जा?
जन्मभराचे नाते क्षणात तोडून जा?
चाललीच आहेस तर जाताना एवढे कर,
मनावरून माझ्या तुझी आकृती खोडून जा.

ऋण माझ्या प्रेमाचे तू फेडून जा,
न परतण्याची काळी रेघ काढून जा,
चाललीच आहेस तर जाताना एवढे कर,
देहावर माझ्या कायमची चादर ओढून जा.

मग कधी आठवणींचा अल्बम काढून पहा,
मनाच्या तुटल्या तारा कधी परत जोडून पहा,
नाहीच जमले हे तर एवढे कर,
परत कुणाच्या तरी प्रेमात पडून पहा.

जाताना एकदा मागे वळून तरी पहा,
माझ्या प्रेमाचा खरा अर्थ कळून तरी पहा,
नाहीच जमले हे तर एवढे कर,
जाता जाता दोन अश्रू रडून तरी जा.

--- वैभव

Tuesday, June 22, 2010

.पहिले न मी तुला, तू मला न पहिले...

एक मुलगा रोज त्याच्या स्वप्नांमध्ये त्याच्या प्रेयसीला बघायचा. रोज चुकता ती त्याच्या स्वप्नांमध्ये येउन त्याची जोप मधुर करून जायची. त्याने आजपर्यंत तिला कधीही प्रत्यक्षत पाहिलेले नवते. त्याला तर हे ही नव्हते नाहीत की वास्तविक दुनियेत ती आहे तरी का? पण रोज तिला स्वप्नांमध्ये पाहून तो तिच्या नितांत प्रेमामध्ये पडला होता. अणि तिच्यासाठी त्याने आपल्या भावना शब्दांद्वारे एक कागदावर उतरविल्या...

पाहिले मी तुला, तू मला पाहिले,
नकळत तुझे ते रूप तरी, डोळ्यांदेखत राहिले.
समजावू तरी किती माझिया या वेडया मना,
पाहण्यासाठी तुज मन हे माझे वेडेपिसे जाहिले.

डोळे मिटता स्वप्नांमध्ये असते तुझेच दर्पण,
उघडता पापणी डोळ्यांची, होते तुझेच स्मरण.
लवता पाते खालीवर, येते तुझीच आठवण,
मनात माझ्या अशी काही, झालिये तुझीच साथवन

एकदातरी तुझ्या कोमल कवेत मला सामावून घेना,
स्वप्नान्तुनी बाहेर खरिखुरी कधीतरी एकदा येना.
कारण, पाहिले मी तुला अन तुही मला पहिलेना,
रम्य तुझे ते रूप तरी डोळ्यांतुन माझ्या घालवेना.

--- वैभव