Saturday, February 26, 2011

एक सायंकाळ अशी....

काय एक दिवस कधी असा उजाडू देशील का?
एखादे वेळी माझे सोबत फिरायला येशील का?
तुला बाहेर चलायला मी जर विचारले असता
एक सायंकाळ माझ्यासोबत घालवशील का?

माझ्याबद्दल घरी पूर्व कल्पना देऊन ठेवशील का?
माझ्या वतीने घरच्यांना तूच विचारशील का?
घरच्यांची जर परवानगी असली जाण्याला तर
एक सायंकाळ माझ्यासोबत घालवशील का?

मी म्हणील तो आवडीचा ड्रेस घालशील का?
केसांत मोहक मोगऱ्याचा गजरा माळ्शील का?
गाडीवर बसून माझ्या बाहेर जाऊन एकदा
एक सायंकाळ अशी माझ्यासोबत घालवशील का?

'त्या' तळ्याकाठी पाण्यात पाय टाकून बसशील का?
आकाशातल्या चंद्राला तुझ्या रूपाने लाजवशील का?
स्वर्गात असल्याचा अनुभव मला एकदा देण्यासाठी
एक सायंकाळ अशी माझ्यासोबत घालवशील का?

तळ्याकाठच्या तुझ्या आवडीच्या हॉटेल मध्ये जाऊन
तळ्याकाठच्याच टेबलवर माझ्यासोबत बसशील का?
मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात डिनर करण्यासाठी
एक सायंकाळ अशी माझ्यासोबत घालवशील का?

मला कदाचित काही बोलायचे राहिलच तुझ्याशी तेव्हा
तर ते बोलण्यासाठी हातात हात माझ्या देशील का?
आणि बोलून झाल्यावर सर्व काही माझे तुझ्याशी
तो हात तसाच ठेऊन मला जन्मभराचा साथ देशील का?

-वैभव

Tuesday, February 22, 2011

पण तो विश्वासच मला दिसला नाही...

आज सांगायचे होते तुला काही,
आज विचारायचे होते तुला काही,
पण एवढ्या जुन्या मैत्रीत आपल्या
तो विश्वासच मला दिसला नाही.

जो विश्वास दिसला तो पुरेसा नाही,
हवा तसा विश्वास दिसला नाही,
कदाचित जो विश्वास मी शोधतोय
तो मला कधी मिळेलही की नाही?

जे बोलायचे होते ते बोलू शकलो नाही,
जे विचारायचे ते विचारू शकलो नाही,
एक शेवटचा पर्याय नेहमीचा म्हणून
आज या कागदावर मी उतरविली शाई.

Tuesday, February 8, 2011

आहे माझी एक चांगली मैत्रीण लहानशी, नाव आहे तिचे 'स्नेहल' उर्फ 'आयुषी'

असाच त्यादिवशी ऑर्कुट वर बसून होतो,
कसल्यातरी कारणाने आधीच रुसून होतो,
वेळच जात नव्हता म्हणून त्रासून होतो.

अचानक एका जुन्या मैत्रिणीची आठवण झाली,
ऑर्कुटवर तिला शोधण्याची इच्छा झाली,
आणि तिच्या नावाची अक्षरे तिथे लिहिली.

जिला शोधायचे ती तर दूरच राहिली,
सारख्याच नावाची दुसरी प्रोफाईल पाहिली,
आणि पहिलीची रिक्वेस्ट तिच्या नावे वाहिली.

अनोळखी रिक्वेस्ट पाहून तीही जरा दचकली.
पण का कुणास ठाऊक तीही तिने स्वीकारली,
आणि मग..... मला एक नवी मैत्रीण मिळाली.

ही मैत्रीपण म्हणजे अगदीच आगळी असते,
जरी जीवनात मैत्रीच काही सगळी नसते,
पण तरीही सर्व नात्यांपेक्षा वेगळी असते.

कधी वाटलेही नव्हते असे कधी घडेल म्हणून,
अचानक अशी हक्काची मैत्रीण मिळेल म्हणून,
"वाढदिवशी शुभेच्चा न दिल्यास चिडेल म्हणून."

लहान असूनही मला कधी कधी समजावत असते,
उपदेशाचे दोज अधूनमधून सुनावत असते,
नाहीच कळले मला तर माझ्यावर रागावत असते.

एकदा तिची वाढदिवसाची तारीख डोक्यातून निघून गेली होती,
आणि म्हणूनच तेव्हा ती माझ्यावर रुसली होती,
आणि मग आठवडाभर अजिबात हसली नव्हती.

म्हणूनच माझ्या डोक्यात जरा प्रकाश पडला,
तिला कविता समर्पित करण्याचा विचार कळला,
आणि त्यातूनच इथे हा शब्दांचा वर्षाव घडला.

आहे माझी एक चांगली मैत्रीण लहानशी,
नाव आहे तिचे 'स्नेहल' उर्फ 'आयुषी'
वाटते तिची मैत्री राहावी नेहमीच अशी.

ही कविता एकदा तुझ्या डोळ्याखालून जाऊ दे,
तुझ्या मैत्रीचे "स्नेह" सदैव माझ्या "आयुष्यी" राहू दे,
आणि माझी ही छोटीशी भेट जर तुला आवड्लीच,
तर एक गोड असे स्मित तुझ्या ओठांवर येऊ दे.

- तुझा मित्र
वैभव