Tuesday, February 8, 2011

आहे माझी एक चांगली मैत्रीण लहानशी, नाव आहे तिचे 'स्नेहल' उर्फ 'आयुषी'

असाच त्यादिवशी ऑर्कुट वर बसून होतो,
कसल्यातरी कारणाने आधीच रुसून होतो,
वेळच जात नव्हता म्हणून त्रासून होतो.

अचानक एका जुन्या मैत्रिणीची आठवण झाली,
ऑर्कुटवर तिला शोधण्याची इच्छा झाली,
आणि तिच्या नावाची अक्षरे तिथे लिहिली.

जिला शोधायचे ती तर दूरच राहिली,
सारख्याच नावाची दुसरी प्रोफाईल पाहिली,
आणि पहिलीची रिक्वेस्ट तिच्या नावे वाहिली.

अनोळखी रिक्वेस्ट पाहून तीही जरा दचकली.
पण का कुणास ठाऊक तीही तिने स्वीकारली,
आणि मग..... मला एक नवी मैत्रीण मिळाली.

ही मैत्रीपण म्हणजे अगदीच आगळी असते,
जरी जीवनात मैत्रीच काही सगळी नसते,
पण तरीही सर्व नात्यांपेक्षा वेगळी असते.

कधी वाटलेही नव्हते असे कधी घडेल म्हणून,
अचानक अशी हक्काची मैत्रीण मिळेल म्हणून,
"वाढदिवशी शुभेच्चा न दिल्यास चिडेल म्हणून."

लहान असूनही मला कधी कधी समजावत असते,
उपदेशाचे दोज अधूनमधून सुनावत असते,
नाहीच कळले मला तर माझ्यावर रागावत असते.

एकदा तिची वाढदिवसाची तारीख डोक्यातून निघून गेली होती,
आणि म्हणूनच तेव्हा ती माझ्यावर रुसली होती,
आणि मग आठवडाभर अजिबात हसली नव्हती.

म्हणूनच माझ्या डोक्यात जरा प्रकाश पडला,
तिला कविता समर्पित करण्याचा विचार कळला,
आणि त्यातूनच इथे हा शब्दांचा वर्षाव घडला.

आहे माझी एक चांगली मैत्रीण लहानशी,
नाव आहे तिचे 'स्नेहल' उर्फ 'आयुषी'
वाटते तिची मैत्री राहावी नेहमीच अशी.

ही कविता एकदा तुझ्या डोळ्याखालून जाऊ दे,
तुझ्या मैत्रीचे "स्नेह" सदैव माझ्या "आयुष्यी" राहू दे,
आणि माझी ही छोटीशी भेट जर तुला आवड्लीच,
तर एक गोड असे स्मित तुझ्या ओठांवर येऊ दे.

- तुझा मित्र
वैभव

2 comments:

  1. aayla kasle bhari re.
    evdhe sunder gift konich nahi dile re mala.
    thnk u mhanun parka nahi karnar.
    khup avdli.

    ReplyDelete