Saturday, February 26, 2011

एक सायंकाळ अशी....

काय एक दिवस कधी असा उजाडू देशील का?
एखादे वेळी माझे सोबत फिरायला येशील का?
तुला बाहेर चलायला मी जर विचारले असता
एक सायंकाळ माझ्यासोबत घालवशील का?

माझ्याबद्दल घरी पूर्व कल्पना देऊन ठेवशील का?
माझ्या वतीने घरच्यांना तूच विचारशील का?
घरच्यांची जर परवानगी असली जाण्याला तर
एक सायंकाळ माझ्यासोबत घालवशील का?

मी म्हणील तो आवडीचा ड्रेस घालशील का?
केसांत मोहक मोगऱ्याचा गजरा माळ्शील का?
गाडीवर बसून माझ्या बाहेर जाऊन एकदा
एक सायंकाळ अशी माझ्यासोबत घालवशील का?

'त्या' तळ्याकाठी पाण्यात पाय टाकून बसशील का?
आकाशातल्या चंद्राला तुझ्या रूपाने लाजवशील का?
स्वर्गात असल्याचा अनुभव मला एकदा देण्यासाठी
एक सायंकाळ अशी माझ्यासोबत घालवशील का?

तळ्याकाठच्या तुझ्या आवडीच्या हॉटेल मध्ये जाऊन
तळ्याकाठच्याच टेबलवर माझ्यासोबत बसशील का?
मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात डिनर करण्यासाठी
एक सायंकाळ अशी माझ्यासोबत घालवशील का?

मला कदाचित काही बोलायचे राहिलच तुझ्याशी तेव्हा
तर ते बोलण्यासाठी हातात हात माझ्या देशील का?
आणि बोलून झाल्यावर सर्व काही माझे तुझ्याशी
तो हात तसाच ठेऊन मला जन्मभराचा साथ देशील का?

-वैभव

3 comments: