Saturday, March 12, 2011

"खरंच प्रेमात तर नाही ना मी?"


बागेच्या बाकावर बसून असतो तेव्हा मला आठवते मी आणि ती,
रोज फिरायला येतो आम्ही आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवते ती.

मग मावळत्या सूर्याकडे पाहतो तेव्हा मला आठवते मी आणि ती,
स्वतः सूर्याकडे पाहत असूनही माझी नजर स्वतःवर खिळवते ती.

त्या कोपऱ्यातल्या झाडाकडे पाहतो तर मला आठवते मी आणि ती,
त्याखाली बसून तिच्या केसांशी खेळतो मी आणि हळूच लाजते ती.

बागे लगतच्या तळ्याकडे पाहतो तर मला आठवते मी आणि ती,
संथ पाण्यात पाय टाकून माझ्या हातावर कविता करत असते ती.

आकाशात काळभोर ढग दाटून आले की मला आठवते मी आणि ती,
मोठा गडगडाट झाला जर विजेचा तर मला घट्ट अशी मिठी मारते ती.

जर कुठले एखादे जोडपे पहिले बागेत तर मला आठवते मी आणि ती,
मैत्रीशिवाय काही नाते नाही आमच्यात तरीही फार आपलीशी वाटते ती.

आता डोळे मिटले जरा, तरी स्वप्नी दिसत असते फक्त मी आणि ती,
उघडले डोळे जेव्हा कधी तर समोरही असते तर तीचीच प्रतिकृती .

आता प्रत्येक जागी, प्रत्येक क्षणी मला आठवते फक्त मी आणि ती,
कधी कधी मलाही संशय येतो, की "खरंच प्रेमात तर नाही ना मी?"

- वैभव.

Sunday, March 6, 2011

तुझ्या सोबत असताना...



तुझ्या सोबत असताना, माझे सारे विश्वच नवे असते,
सर्व काही त्यागून फक्त तुझे सान्निध्य मला हवे असते.

हातात हात देता तुझ्या, असर असा काही पडतो,
जगात असतानाही या जगाचा मला विसर पडतो.

काही जवळ नाही अन कसली गरजही भासत नसते,
कुशीत तुझ्या शिरता माझ्या ध्यानात काहीच नसते.

कितीही तुझ्यातून मन वळवले तरी ते वळत नाही,
तुझ्यासाठीच जगतेय मी हे कारे तुला कळत नाही?

तुझ्यासोबत पाहून माझी आता सारे थत्त उडवणार रे
पुरे झाले आता.... "प्रिये...... तू माझी होशील का?"
......... असे तू मला कधी विचारणार रे?

- वैभव.