Saturday, July 7, 2012

हे आयुष्याचं गणित...

आयुष्याच हे गणित फारच विचित्र आहे
अजून पर्यंत कुणाला उलगड्लेलच नाही,
सुटता सुटेना कुणास काही केल्या जमेना
पण वाटतंय की अजून काही बिघडलेलच नाही.

बघता बघता अख्खं आयुष्य निघून जातं
रुपये पैश्याच्या या बेरीज अन वजाबाकीत,
कमवता कमवता पूर्ण आयुष्य शेवटला येतं
अन मोलाचे क्षण मात्र राहून जातात थकीत.

सुखाचा गुणाकार अन दुःखाचा भागाकार
सतत चालू राहतात डोक्यात असले प्रश्न,
जे जवळ आहे त्यात कधी समाधान नाही
म्हणून लोन च्या नावावर घेतो सुखं उसण.

आधी नौकरी मग लग्न मग गाडी मग बंगला
असा मुलभूत गरजांचा करत असतो कंचेभागुबेव
एक एक करत मुलभूत गरजा भागल्या गेल्या
तरी तू मात्र या लोभापायी हा हव्यास चालू ठेव.

जीवनातलं ध्येय अगदी "एक्स" सारखं झालंय.
कितीही माळे बांधून बसलो टाकून खुर्ची टेबल
अन जरी कितीही पैसे, कितीही यश कमावले
तरीही मात्र "एक्स इज अन अननोन वेरीएबल".

खरंच फारच विचित्र आहे हे आयुष्याचं गणित.
कधीही कुणाला पूर्णपणे उलगडलेल नाही अजून.
जीवन संपूनही जाईल आणि जवळ येईल मरण
तरीही असच अर्धवट राहील हे मोठ्ठ समीकरण.

                                                 -- वैभव

No comments:

Post a Comment