Wednesday, April 20, 2011

तुला पाहिल्यापासूनच....

कविता वैगेरे तसा मी करायचो ते पहिल्यापासूनच,
पण त्यांचे यमक जुळायला लागले ते तुला पाहिल्यापासूनच
आणि त्यांना अर्थही मिळायला लागला तो तुला पाहिल्यापासूनच.

विचारही फार करायचो मी तसा... तेही पहिल्यापासूनच,
पण ते कागदावर उतरायला लागले ते तुला पाहिल्यापासूनच
अनो स्वतःची सीमा विसरायला लागले, तेही तुला पाहिल्यापासूनच.

प्रेम असतं यावर माझा विश्वासच नव्हता... पहिल्यापासूनच
पण प्रेमाचा खरा अनुभव यायला लागला तो तुला पाहिल्यापासूनच
आणि नसल्याक्षनीही तुझा भास व्हायला लागला, तो तुला पाहिल्यापासूनच.

प्रेम किती सुंदर कल्पना हे ठाऊकही नव्हते पहिल्यापासूनच,
पण त्या कल्पनेचा अंदाज यायला लागला तो तुला पाहिल्यापासूनच
आणि अंदाजाचा अनुभवही यायला लागला तोही तुला पाहिल्यापासूनच.

जगतही होतोच मी, सर्व जगतात तसा... पहिल्यापासूनच
पण त्या जगण्याला अर्थ मिळायला लागला, ते तुला पाहिल्यापासूनच
आणि हा प्रेमवेडा... पूर्णपणे तुझा व्हायला लागला, तेही तुला पाहिल्यापासूनच.

-वैभव

1 comment: