Sunday, September 18, 2011

हो, मला छंद जडलाय कविता करण्याचा...



होमला छंद जडलाय कविता करण्याचा,
मन माझ रीत करून कोरी पानं भरण्याचा
कल्पनेच्या जगात सारच गृहीत धरण्याचा

प्रत्येक गोष्टीकडे जरा नव्याने बघण्याचा,
वास्तविकतेच्या पलीकडे जाऊन बघण्याचा
मला छंद जडलाय कल्पनेच्या जगात जगण्याचा

मी ही मग सवय करून घेतलीये कविता करण्याची,
कारण आवड आहे मला तुझे रूप शब्दांत मांडायची,
अन शब्द अपुरे पडलेत की त्यांच्यावर हसण्याची

तुलाही आवड आहेच माझ्या कवितेवर लाजायची,
अन मलाही आवड आहे तुला तसंच बघायची,
म्हणून मी ही सवय करून घेतलीये कविता करण्याची.

सारे म्हणतात मला कसली ही सवय तुझी कवितेची?
व्यवसाय सोडून का मांडणी करत बसतोस शब्दांची?
पण त्यांना काय सांगू की मला नाही गरज पैशांची...
जगण्यासाठी गरज आहे मला तुला हसत बघण्याची...

                                                                     --वैभव.

3 comments: