त्याचं प्रेमपत्र... तिचं प्रेमपत्र...
काही सांगायचंय तुला, एकदा वाचून घेशील.. तू लिहिलेलं पत्र मिळालं मला तुझं काल.
नाही पटलं तुला तर फक्त पत्र फाडून देशील. अन सोबत पाठवलेलं गुलाबच फुल लाल.
कधी बोललो नाही कारण धाडसंच झालं नाही, ए मला नव्हतं माहिती तू कविता करतोस ते.
अन धाडस झालं, तेव्हा प्रसंगच आला नाही. अन कवितांमधून मुलींची मन चोरतोस ते.
आज अचानक वाटलं आज नाही तर कधी नाही.. पत्र वाचून आधी थोडं घाबरल्यासारखं वाटलं.
एकदा सांगावंच सारं आता कसलीही भीती नाही. म्हंटलं यांनी कदाचित माझं मन तर नाही वाचलं.
तुला पहिल्यांदा पाहताच हे असं सारं घडलं होतं, पण मला आवडली तुझी कविता, छान होती फार.
बघता क्षणीच मला तुझ्यावर प्रेम जडलं होतं... रमीनं पण वाचली, ती तर दिवानीच झाली तुझी पार.
प्रेमात नक्की काय करावं हे तर माहिती नाही मला, ती तर म्हणे, आत्ता फोन कर, याला सर्व सांगून टाक.
पण स्वतः हूनही जास्त प्रेम करील अशी खात्री देतो तुला. मी म्हंटलं मी कशाला, त्यालाच करू दे ना सुरुवात.
आणखी काही सुचत नाहीये, जास्त लिहित नाही मी. अन काय रे, कोपरा कसा देणार, तू कसा सामावशील?
कारण या आधी कधी कुणाला पत्रही लिहिलं नाही मी. इथं तर साम्राज्यच तुझं आहे, जागा कशी गमावशील?
नाहीच पटलं तुला तर फक्त हे पत्र फाडून देशील. पण तरी, मी मात्र कधी बोलणार नाही, मी गप्प राहील.
मनाच्या एखाद्या कोपऱ्यात एक आठवण तेवढी ठेवशील. तूच बोलावं वाटतं मला, तोवर वाटल्यास मी वाट पाहिलं.
--- वैभव.
No comments:
Post a Comment