मी जेव्हा या तुझ्या चेहऱ्याकडे बघतो ना...
दोन क्षण मला तसंच तिथे थांबावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जग मला तसंच तिथे थांबवावंस वाटतं.
मग सारं जग स्थिर, अन मी तुला बघायचं..
मग तुला हळूच माझ्या मिठीत घ्यावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
सारं जीवन तुझ्यावर लुटवून द्यावंस वाटतं.
तू मिठीत अन तुझी नजर माझ्या नजरेखाली,
अख्खं जीवन मला त्या क्षणात जगावंस वाटतं.
पण जेव्हा तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
तर सारं काही विसरून, तू तसंच बघावंस वाटतं.
मग मी हि तुला तसंच, एक सारखं बघायचं..
मग ते सारं काही जुनं, नव्याने घडावंस वाटतं..
अन जेव्हा, तू माझ्याकडे रोखून बघतेस ना..
परत मला एकदा तुझ्या प्रेमात पडावंस वाटतं..
---वैभव.
No comments:
Post a Comment