प्रेम तसा तुझ्यावर मी करतो तर खरा
- वैभव
पण सांगायला तुला मी घाबरतो जरा.
शब्द न शब्द जपून ठेवलाय मी मनाशी
पण बोलवत नाहीच कधी ओठां द्वारा.
भावना फक्त वाहतात, जश्या पावसाच्या सरा.
शब्द मात्र साचून राहतात, जश्या राहतात गारा.
धाडस केले जरी कधी सारं सांगण्याचे तुला
तरी पाहताच तुला विसर पडतो जगाचा सारा.
मला आधी वाटायचे की मी एकटाच होतो बरा.
पण कळाले नंतर की भ्रम होता तो माझा जरा.
कारण जेव्हापासून आलीस तू स्वप्नात माझ्या
तेव्हा कळू लागलाय मला जगण्याचा अर्थ खरा.
मला नाहीच वाटत मी कधी सांगू शकेल तुला,
तू कधीतरी घेणा जाणून काय आहे माझ्या मना.
खरंच, तसा तर फार प्रेम करतो मी तुझ्यावर खरा.
सांग ना, जुळतील का कधी या दोन मनांच्या तारा??
- वैभव
perfectly expressd feelings... carry on....
ReplyDelete