एकटाच हे जीवन मी जगत आलोय...
दुसऱ्यांसाठी दिव्यासारखा धगत आलोय...
चंद्राला ताऱ्याची अन पावसाला साथ वाऱ्याची,
घडत असताना जन्मोजन्मी मी बघत आलोय....
एकाकीपणाची जाणीव आता होऊ लागलीये...
तू नाहीस सोबत याचा खंत होऊ लागलाये...
पाहिलीये वाट आजवर तुझ्या येण्याची पण...
मनाच्या सहन्शिलातेचाही अंत होऊ लागलाये...
मलाही कुणीतरी हवंय आता साथीला...
सदा तेलाची साथ असते जशी वातीला...
सुखदुःखाच्या वाटेवर चालावे सोबत कुणी,
म्हणून एक हात हवाय आता हातीला...
नाहीच आली तू तर मरण तर येणार नाही...
पण एकटा या जगात जगुनही जगणार नाही...
किती प्रेम आहे तुझ्यावर बघ तर विचारून एकदा,
कळाल्यावर तुला तुही विसरू शकणार नाही.
वाटत असेल तुला की छंद आहे मला तुझा...
पण नाद नाही तर नड आहे तू माझी आणि...
चंद्राच्या साक्षीने चांदण्यासारखा जपीन तुला,
एकदाची मला सांग "होशील का माझी राणी ?"
-- वैभव
No comments:
Post a Comment