आज परत पाऊस काही आठवून गेला..
अजूनही नितांत प्रेमात आहे मी तुझ्या,
परत तेच ते एक मनाला पटवून गेला.
झाडांची पानं चिंब न चिंब भिजवून गेला..
भिजवलेल्या हिरव्या गार झाडांसोबत,
साऱ्याच जुन्या गोष्टी मनात सजवून गेला.
रुसून असलेल्या कळ्यांना हसवून गेला..
आणि कसाबसा जरा बाहेर मी येत होतो,
तर परत तुझा चेहरा मनावर ठसवून गेला.
पाऊस आला, कोसळला आणि निघून गेला..
मी बसून होतो तसाच.. तिथेच झोक्यावर एकटा,
मला आतल्या आत भिजत असताना बघून गेला.
--वैभव.
No comments:
Post a Comment