ती एकदा म्हणाली मला,
की तू नक्कीच कुणावर तरी फार प्रेम करतोस..
नाहीतर एवढ्या कविता कश्या काय करतोस...
मी म्हणालो,
अग त्यासाठी प्रेम करावंच लागतं असं नाही..
तर जणू मनातल्या भावनांना फक्त शब्द देणं जसं काही..
ती म्हणाली,
नाही काही, मनाला पटणारं असं कुणी भेटलं ना मनाला..
की तरच मुळी आपल्या मनामध्ये त्या भावना जागतात..
मी म्हणालो,
तसंच नाही गं,, पण आतंच जास्त गर्दी झाली ना कधी..
तर त्या आपोआप अश्या शब्दांद्वारे बाहेर येऊ बघतात...
ती म्हणाली,
ठीक आहे, समज पटलंय मला तू जे काही म्हणतोयस..
पण मग तुझ्या प्रत्येक कवितेत 'ति'चाच उल्लेख का असतो?
मी म्हणालो,
अगं, आता त्या भावना आहेत "या वेड्या मनाच्या"..
त्यांच्यावर माझा असा नेहमीच पुरेपूर ताबा नसतो..
ती गोड हसली, म्हणाली,
हा हा हा, तुझ्याच मनावर तूझाच ताबा नाही..
म्हणजेच इथे नक्कीच शिजतंय काही तरी..
मी म्हणालो,
बरं बाबा, तुला जे समजायचं आहे ते समज..
पण खरंच, अजून मला प्रेयसी नाही खरी खुरी..
मी मग मनात म्हणालो,
इला आता सांगू तरी कसा, की तूच माझी प्रेरणा खरी..
दुसरी तिसरी कुणीही नसून तूच आहेस माझी स्वप्नपरी..
ती मनात म्हणाली..
काय सांगू, मलाही मनापासून वाटत एखादे वेळेस कधीतरी..
-वैभव.
No comments:
Post a Comment