तू सोबत आहेस माझ्या
तर मला नाही परवा या जगाची
मी कशाला धरू भीती कुणाची.
जे काही आहे आत्ता आहे
कशाला करू मी चिंता उद्याची
सोबत तुझ्या जगण्यासाठी
पुरेल मला साथ तुझ्या हृदयाची.
सहजासहजी नाही तुटणार
जरी असली गाठ कच्च्या धाग्याची.
एक नाही किंवा दोन नाही
तर शपथ आहे ही साता जन्मांची
एक दिवस नक्की उजाडेल
जेव्हा डोळे उघडतील या जगाची,
आणि तेव्हा त्यांना कळेल
काय आहे ही "प्रीती तुझी नि माझी".
तोवर असाच सोबत रहा
तर मला नाही परवा या जगाची.
आयुष्यभर असेच राहूत
जणू देहात एका आत्मा दोघांची.
-वैभव.
khup ch mst....
ReplyDeletethnx a lot samira.... thnk u very much
ReplyDeletesahi hai boss
ReplyDelete