Wednesday, June 27, 2012

तर आज आमचाही एखाद अफेयर असतं.

आजकाल जरा जास्तच वाटाले लागल मले
आठवून राहिले राहून राहून दिवस कालेजातले
त्यावेळी जर आमी नं केल थोडं फार डेयर असतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

आवडली होती मले बी एक पोरगी कालेजामंदी
अन तिकडून ही येत होता रीस्पोंस इशाऱ्या मंदी
पर तेवा जर का अभ्यासच केलं येवढ केयर नसतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

वाचून फेसबुक वर रिलेशनशिप स्टेटस वरचेवर
आमच्याही मनात करते सतत एक गोष्ट घर
सालं आमचंही नशीब जरासं का फेयर असतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

कारा डोम्ड्या पोरासोबत गोरी चिट्टी पोरगी पाहून
आतल्या आत घेते आंग अख्खं काळीज खाऊन.
आमच्याही खिश्यात जर का पैश्याचं लेयर असतं
तर साला आज आमचंही एखादं अफेयर असतं.

पोरगी भेटली म्हणून एवढा कायचा रुबाब लेकहो
आमी न सोडली म्हणूनच तुमाले थे पटली राजेहो.
कारण आदी आमी न जर नशीब ट्राय केल असतं
तर सालं आज आमचाही एखाद अफेयर असतं.

तसं नेहमीच काई असं वाटत नाही आमाले पर
आज वाटलं का असती एखादी आपली बी तर
म्हणून म्हणतो का आमी केल थोडं डेयर असतं
तर साला आज आमचाही एखाद अफेयर असतं.

-वैभव

Tuesday, June 19, 2012

"प्रीती तुझी नि माझी"


तू सोबत आहेस माझ्या
तर मला नाही परवा या जगाची
जग  माझे तुज्यात आहे
मी कशाला धरू भीती कुणाची.

                        जे काही आहे आत्ता आहे
                        कशाला करू मी चिंता उद्याची
                        सोबत तुझ्या जगण्यासाठी
                        पुरेल मला साथ तुझ्या हृदयाची.

सहजासहजी नाही तुटणार
जरी असली गाठ कच्च्या धाग्याची.
एक नाही किंवा दोन नाही
तर शपथ आहे ही साता जन्मांची

                         एक दिवस नक्की उजाडेल
                         जेव्हा डोळे उघडतील या जगाची,
                         आणि तेव्हा त्यांना कळेल
                         काय आहे ही "प्रीती तुझी नि माझी".

तोवर असाच सोबत रहा
तर मला नाही परवा या जगाची.
आयुष्यभर असेच राहूत
जणू देहात एका आत्मा दोघांची.
                                                 -वैभव.









Saturday, June 16, 2012

माझिया प्रियाला प्रीत कळेना.

आजकाल माझ असं का होतंय काही कळेना,
शरीर जागी असलं तरी चित्त जागी असेना.

काही करावे तरी मन हे माझ कुठेच लागेना
देह बोलतो एक तरी मन त्यासारखे वागेना.

कोटी प्रयत्न केला तरी मन तुझ्यातून वळेना
पाखरू तुज्या विचारांचे हृदयातून या उडेना.

कितीही जुळवले शब्द तरी तुजवीन ते जुळेना
पण  माझिया प्रियाला मात्र प्रीत ही कळेना.

--  वैभव