Friday, June 25, 2010

चाललीच आहेस तर जाताना एवढे कर...

गैरसमजातून झालेल्या भांडणामुळे जेव्हा ती त्याला सोडून निघून गेली, तिच्या विरहाने तो वेडा पिसा झाला. त्याच्या वारंवार थांबव्ण्यानेही जेव्हा ती नाही थांबली, त्याने स्वतःचा देह त्यागून दिला. पण दुर्दैवाने त्याच्या आत्म्यालाही तिचा विसर नाही पडू दिला आणि तो तिच्या परत येण्याची वात बघू लागला.

मी कुठे म्हंटले कि मला सोडून जा?
जन्मभराचे नाते क्षणात तोडून जा?
चाललीच आहेस तर जाताना एवढे कर,
मनावरून माझ्या तुझी आकृती खोडून जा.

ऋण माझ्या प्रेमाचे तू फेडून जा,
न परतण्याची काळी रेघ काढून जा,
चाललीच आहेस तर जाताना एवढे कर,
देहावर माझ्या कायमची चादर ओढून जा.

मग कधी आठवणींचा अल्बम काढून पहा,
मनाच्या तुटल्या तारा कधी परत जोडून पहा,
नाहीच जमले हे तर एवढे कर,
परत कुणाच्या तरी प्रेमात पडून पहा.

जाताना एकदा मागे वळून तरी पहा,
माझ्या प्रेमाचा खरा अर्थ कळून तरी पहा,
नाहीच जमले हे तर एवढे कर,
जाता जाता दोन अश्रू रडून तरी जा.

--- वैभव

4 comments:

  1. nice one...
    pan tuza prembhang koni kela re.... ;)

    ReplyDelete
  2. he he he.... tyasathi prembhang hone he aavshyak nahi ahe g... me tar kavi manacha manus ahe ....

    ReplyDelete
  3. kai lihle be sala gajab ekdum touchy....hatts off yaar

    ReplyDelete