एक मुलगा रोज त्याच्या स्वप्नांमध्ये त्याच्या प्रेयसीला बघायचा. रोज न चुकता ती त्याच्या स्वप्नांमध्ये येउन त्याची जोप मधुर करून जायची. त्याने आजपर्यंत तिला कधीही प्रत्यक्षत पाहिलेले नवते. त्याला तर हे ही नव्हते नाहीत की वास्तविक दुनियेत ती आहे तरी का? पण रोज तिला स्वप्नांमध्ये पाहून तो तिच्या नितांत प्रेमामध्ये पडला होता. अणि तिच्यासाठी त्याने आपल्या भावना शब्दांद्वारे एक कागदावर उतरविल्या...
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले,
नकळत तुझे ते रूप तरी, डोळ्यांदेखत राहिले.
समजावू तरी किती माझिया या वेडया मना,
पाहण्यासाठी तुज मन हे माझे वेडेपिसे जाहिले.
डोळे मिटता स्वप्नांमध्ये असते तुझेच दर्पण,
उघडता पापणी डोळ्यांची, होते तुझेच स्मरण.
लवता पाते खालीवर, येते तुझीच आठवण,
मनात माझ्या अशी काही, झालिये तुझीच साथवन।
एकदातरी तुझ्या कोमल कवेत मला सामावून घेना,
स्वप्नान्तुनी बाहेर खरिखुरी कधीतरी एकदा येना.
कारण, पाहिले न मी तुला अन तुही मला पहिलेना,
रम्य तुझे ते रूप तरी डोळ्यांतुन माझ्या घालवेना.
--- वैभव
mastch yar
ReplyDelete