बागेच्या बाकावर बसून असतो तेव्हा मला आठवते मी आणि ती,
रोज फिरायला येतो आम्ही आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवते ती.
मग मावळत्या सूर्याकडे पाहतो तेव्हा मला आठवते मी आणि ती,
स्वतः सूर्याकडे पाहत असूनही माझी नजर स्वतःवर खिळवते ती.
त्या कोपऱ्यातल्या झाडाकडे पाहतो तर मला आठवते मी आणि ती,
त्याखाली बसून तिच्या केसांशी खेळतो मी आणि हळूच लाजते ती.
बागे लगतच्या तळ्याकडे पाहतो तर मला आठवते मी आणि ती,
संथ पाण्यात पाय टाकून माझ्या हातावर कविता करत असते ती.
आकाशात काळभोर ढग दाटून आले की मला आठवते मी आणि ती,
मोठा गडगडाट झाला जर विजेचा तर मला घट्ट अशी मिठी मारते ती.
जर कुठले एखादे जोडपे पहिले बागेत तर मला आठवते मी आणि ती,
मैत्रीशिवाय काही नाते नाही आमच्यात तरीही फार आपलीशी वाटते ती.
आता डोळे मिटले जरा, तरी स्वप्नी दिसत असते फक्त मी आणि ती,
उघडले डोळे जेव्हा कधी तर समोरही असते तर तीचीच प्रतिकृती .
आता प्रत्येक जागी, प्रत्येक क्षणी मला आठवते फक्त मी आणि ती,
कधी कधी मलाही संशय येतो, की "खरंच प्रेमात तर नाही ना मी?"
- वैभव.
kay mg milale ki nahi uttar?
ReplyDeletePan kavita ekdam sahi zaliye.
classic!!! too good!
ReplyDeletevery nice, vaibhav... dil khush ho gaya :)
ReplyDeleteme phakt tula ekach vicharil...
ReplyDeletekharach premattar nahi na tu.....
awesome dude
Mag kadhi bhetanar tula ti aani tila tu? aani kadhi bhetawanar tichyashi aamhala tu?
ReplyDelete