Tuesday, February 22, 2011

पण तो विश्वासच मला दिसला नाही...

आज सांगायचे होते तुला काही,
आज विचारायचे होते तुला काही,
पण एवढ्या जुन्या मैत्रीत आपल्या
तो विश्वासच मला दिसला नाही.

जो विश्वास दिसला तो पुरेसा नाही,
हवा तसा विश्वास दिसला नाही,
कदाचित जो विश्वास मी शोधतोय
तो मला कधी मिळेलही की नाही?

जे बोलायचे होते ते बोलू शकलो नाही,
जे विचारायचे ते विचारू शकलो नाही,
एक शेवटचा पर्याय नेहमीचा म्हणून
आज या कागदावर मी उतरविली शाई.

2 comments:

  1. khup mast..........
    ek maza prayatna han!

    आजकल कागदावर मी करते माझ मन रीतं
    कारण इतकं शांत नसतच कुठले इथे खाते

    ReplyDelete
  2. chan chan ha....
    i loved urs lines..
    let dem go ahead... recite few more...

    ReplyDelete