ही कसली मैत्री, हा कसला दोघांचा जिव्हाळा म्हणायचा,
एकमेकांशिवाय त्यांचा एकही क्षण रिकामा नाही जायचा.
कितीतरी गोष्टी, कितीतरी वेडेपणा अगदी कपल्स सारखा करायचा
पण कुणी का कधी 'प्रेमात असलेले कपल' म्हंटलेच की
'आमच्यात गाढ मैत्री शिवाय काहीच नाही' असा दावा करायचा.
रोज सकाळी त्याला डोळे उघडल्यावर एकच विचार असायचा,
मोबाईल हातात घेऊन आधी तिला त्याने मेसेज करायचा
मग तसंच बिछान्यात तिच्या reply साठी पडून राहायचा
पण कधी जर तिचा लगेच reply आला नाहीच की
मग अस्वस्थ होऊन "उठली नाहीस का अजून?" चा मेसेज पाठवायचा
रोजच सकाळचा अर्धा एक तास त्यांचा यातच जायचा,
याने तिला आणि तिने याला असाच सतत मेसेज करायचा.
कसाबसा मग त्यांचा दिवस मेसेज च्या पुढे जायचा
पण तरीही सायंकाळच्या आधी थोडाही वेळ मिळाला की
परत त्यांचा हा मेसेज चा खेळ सुरु लगेच व्हायचा.
मग तिला कधीतरी बाहेर फिरण्याचा मोह सुटायचा,
आणि पूर्ण दिवस बाईक वर हिंडून बाहेर काढायचा.
रस्ते संपले तरीही हिंडण्याचा मोहाला शेवट नसायचा
कधी जर का जास्तच हिंडून झाल्यावर थोडा दम लागला की
मग ताफा कोपऱ्यावरच्या एखाद्या हॉटेल कडे वळायचा.
तिला तसा नेहमीच डॉमिनोज चा पिझ्झा फारच आवडायचा,
तो मात्र खिशात पैसे नाहीत म्हणून मुद्दाम वडापावच चारायचा.
तिने मग उगाच राग धरून गुलाबी गालांचा फुग्गा करायचा
पण त्याने तिला वडापाव चरायला हात समोर धरला की
तो वडापाव ही तिला मग पिझ्झा चा विसर पाडायचा
दिवसभर बाहेर हिंडून झाल्यावर मग शेवटी घरचा रस्ता पकडायचा,
तिच्या घरी जाऊन मग LCD वर मुव्ही बघण्याचा प्लान बनवायचा.
सतराशे साठ वेळा पाहून झालेला एकच एक चित्रपट परत लावायचा
मग प्रत्येक आवडीचा डायलॉग आणि प्रत्येक आवडीचे गाणे लागले की
ओरडून ओरडून आणि नाचून नाचून साऱ्या घरभर धिंगाणा घालायचा
"पुरे झाली मस्ती आता सांजवाती कडे लक्ष द्या" मग तिला काकू म्हणायच्या,
आणि तिथून निघता न निघणारा त्याचा पाय त्याने जबरदस्तीने काढायचा.
तरीही फाटकापर्यंत जाईस्तोवर नकळत दहावेळा मागे वळून पहायचा
आणि निघतानाच सार समान नीट आठवणीने घेतलं असतानाही
काहीतरी आताच राहील म्हणून तिला शेवटच बाय म्हणायला परत यायचा.
असा हा कार्यक्रम त्यांचा महिन्यातून पाच सहा वेळा तरी चालायचंच.
आणि प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी मला हाच विचार करायला लावायचा.
की खरंच कसली ही मैत्री, हा कसला दोघांचा जिव्हाळा म्हणायचा,
एकमेकांशिवाय त्यांचा कधी एकही क्षण रिकामा नाही जायचा.
पण तरीही कुणी का कधी 'प्रेमात असलेले कपल' असे म्हंटलेच की
'आमच्यात गाढ मैत्री शिवाय काहीच नाही' असा त्यांनी दावा करायचा.
- वैभव.
hi konasathi keleli kavita aahe btw???
ReplyDelete