चंद्राची साक्ष आणि चांदण्यांचा पहारा
तुझ्या सौंदर्याचा हा मनमोहक नजारा
तुझ्या रूपाने उजळलाय असमंत सारा
साद देताहेत माझ्या मनाच्या तारा
जाईचा गंध, ओल्या मातीचा सुगंध
त्यावर तुझे ते गोड, स्मीत मंद मंद
हातात हात जसा नाजूक रेशीम बंध
तुझ्या प्रेमाचाच मला जणू जडलाय छंद
हि बेभान सांज, हा बेधुंद वारा
कोमल रिमझिम या पावसाच्या धारा
दव स्पर्शाने येणारा प्रेमळ शहारा
तुझ्या प्रेमात पडल्याचा देताहेत इशारा.
-- वैभव.