
अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी मी हा असताना
स्वप्नातून तू उतरून यावे घरी कुणीही नसताना
उगाच माझी खोड काढावी डोळे मिटून मी असताना
स्वप्नासारखाच भास व्हावा मला डोळे उघडे असताना
भानही माझे हरपून जावे तुझ्याकडे मी बघताना
स्तुतीपर ते शब्दही लाजावे तुजसाठी जे निघताना
क्षण तो नाजूक तिथेच स्थिरावा मंद स्मित तू देताना
चित्र तुझे मी मग कैद करावे मधुरपणे तू हसताना
चित्राची त्या साथ राहावी समीप कधी तू नसताना
हृदय मी माझे शरण करावे हसत तुला ते बघताना
जगण्याला या अर्थ यावा तो सोबत तुझ्याच जगताना
खरंच, कधीतरी तू खरीखुरी यावी स्वप्न तुझे मी बघताना
अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी मी हा असताना
स्वप्नातून तू उतरून यावे घरी कुणीही नसताना...
प्रेरणा- मिलिंद इंगळे
वैभव